मुंबई लुटून खाणार्‍यांना अमित शाहांवर बोलण्याचा अधिकार नाही : एकनाथ शिंदे


Those who looted and plundered Mumbai have no right to comment on Amit Shah : Eknath Shinde नागपूर (11 डिसेंबर 2025) : उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण चालवल्यानंतर त्यांच्या मदतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले आहेत. ज्यांनी आरोग्य सेवेची दुर्देशा केली. ज्यांनी मुंबई लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. बुधवार, 11 रोजी हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत जोरदार प्रहार करताना वंदे मातरमवर झालेली चर्चा ही संघाची कपडे उतरवण्यासाठी होती का? अशी विचारणा केली.

बुडाखाली असलेले हिंदुत्व पाहिले पाहिजे
उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शाह यांनी त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेण्यापूर्वी त्यांच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत, जे सांगतात की ‘मी गोमांस खातो कोण मला अडवतो बघतो’. यावेळी ठाकरे यांनी रिजिजू अमित शाह यांच्यासोबत जेवतानाचे छायाचित्र दाखवले. ठाकरे यांनी अमित शाह यांना आव्हान दिले की, जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रिजुजू यांना मंत्रिमंडळातून त्वरित काढावे, कारण रिजुजू हे गोमांस खातात असे त्यांनी स्वतः बोलले आहेत.

ते म्हणाले की, पालघरमध्ये घडलेल्या साधू हत्याकांडावरून सरकारला बदनाम करण्यासाठी भाजप/शाह यांनी आकाश-पाताळ एक केले होते. ठाकरे यांनी प्रश्न विचारला की, साधू हत्याकांडातील संबंधित व्यक्तीला भाजपात घेताना अमित शाह यांचे हिंदुत्व काय मेलं होतं? अमित शाह यांनी माझ्या हिंदुत्वावर शंका घेण्यापूर्वी, त्यांच्या बुडाखाली असलेले हिंदुत्व पाहिले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !