कार पंक्चरच्या बहाण्याने 30 लाखांची रोकड लांबवली : शहाद्यातील घटनेने खळबळ
Cash worth 30 lakhs was stolen under the pretext of a car puncture: The incident in Shahada has caused a stir. शहादा (13 डिसेंबर 2025) : कार पंक्चर झाली असल्याचे कारण सांगितल्याने चालक वाहनाखाली उतरताच पाळत ठेवून असलेल्या दुसर्याने वाहनातील 30 लाखांची बॅग घेऊन दुचाकीने पोबारा केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील स्टेट बँकेबाहेर घडली.
पाळत ठेवून केली चोरी
शहादा शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून ग्राहक सेवा केंद्रांना देण्यासाठी लागणारी रक्कम घेण्यासाठी धडगाव स्टेट बँकेच्या शाखेतील कर्मचारी दोन चारचाकी वाहनांनी आले असता एका वाहनात बँक कर्मचारी तर दुसर्यात खाजगी एजन्सीचा चालक होता. बँक कर्मचार्यांकडे 50 लाखांची रोकड होती व सेवा केंद्राला देण्यासाठी 30 लाख रुपये दुसर्या वाहनात होते. चालक चारचाकी (क्रमांक एम.एच.29 जे.2475) मध्ये बसताच एकाने तुमच्या गाडीचे मागचे चाक पंक्चर असल्याचे सांगितल्यानंतर चालक वाहनाखाली उतरताच दुसर्याने लागलीच पैशांची बॅग काढून घेत दुचाकीवरून पोबारा केला.

धूम स्टाईल चोरटे पसार
काही क्षणात घडलेल्या या प्रकारानंतर चालकाने आरडा-ओरड केली मात्र चोरटे दुचाकीवरून सुसाट पसार झाले. ग्राहक सेवा केंद्राचे संचालक रोहिदास आट्या पावरा (43, रा.चोंदवाडे खुर्द, ता.धडगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

