धुक्यामुळे सात बसेससह तीन कार एकमेकांवर आदळल्या : आग लागताच चौघांचा मृत्यू
Due to the fog, three cars and seven buses collided with each other: four people died when a fire broke out मथुरा (16 डिसेंबर 2025) : पहाटेच्या धुक्यामुळे अंदाज न आल्याने भरधाव सात बसेस व तीन कार एकमेकांवर आदळल्या व लागलीच आग लागल्याने या आगीत चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर 150 हून अधिक लोक जखमी झाले. हा भीषण अपघात मथुराजवळ मंगळवारी पहाटे चार वाजता यमुना एक्सप्रेस-वेवर घडला.
भल्या पहाटे भीषण अपघात
डीएम चंद्र प्रकाश सिंह यांच्या माहितीनुसार, हा अपघात बलदेव पोलीस स्टेशन हद्दीतील माइल स्टोन 127 येथे झाला. डीएम आणि एसएसपी यांच्यासह अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य सुरू आहे. पोलीस, अग्निशमन दलच्या मदतीने आग विझविण्यात आली असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

क्षणात लागली आग
भगवान दास यांनी सांगितले की, गाड्या एकमेकांवर आदळल्या तेव्हा गोळीबार झाल्यासारखा आवाज आला. मोठे स्फोट झाले. संपूर्ण गाव तातडीने येथे पोहोचले. सर्व लोकांनी तत्काळ मदत केली. रुग्णवाहिकेचे कर्मचारी अमित कुमार यांनी सांगितले की, किती लोक जखमी झाले आहेत, याची मोजणी सध्या करता येणार नाही.
एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला की, लोक बसच्या खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर उड्या मारत होते. सर्वत्र किंकाळ्यांचा आवाज होता. घटनास्थळी जळालेल्या वाहनांसह अनेकांच्या शरीराचे अवशेषही दिसून आले आहेत.

