धुळ्यातील मोहाडीत वयोवृद्धेची हत्या : संशयीत ताब्यात
संतप्त नागरिकांचा रास्तारोको ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
Elderly woman murdered in Mohadi, Dhule : Suspect taken into custody धुळे (16 डिसेंबर 2025) : धुळ्यातील मोहाडी भागातील दंडेवाला बाबा नगरातील रहिवासी असलेल्या 75 वर्षीय वयोवृद्धेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी अर्धातास महामार्गावर रास्तारोको करीत दोषीवर कारवाईची मागणी केली. गुन्हे शाखेने नशेखोराला ताब्यात घेतले आहे. लिलाबाई हिरामण सूर्यवंशी (75) असे मृताचे नाव आहे.
अधिकार्यांची घटनास्थळी धाव
खुनाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक राजकुमार उपासे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, मोहाडी निरीक्षक शिल्पा पाटील व पथकाने धाव घेतली. मृत महिलेवर अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आघात केल्याने मृत्यू
वयोवृद्धा लिलाबाई झोपल्या असताना संशयीताने तोंडावर मुक्काप्रहार करीत तीन दात तोडले शिवाय कमरेजवळ आघात केल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. संशयीताने घरातील डबे, सिलेंडर व किरकोळ साहित्य लांबवले. या धावपळीत मारेकर्याच्या काही वस्तू खोलीतच राहिल्या असा पोलिसांचा अंदाज आहे.
पालकमंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासन
सुमारे पाच वर्षापूर्वी मृताच्या तरुण मुलाने आत्महत्या केली तर त्यांचे पती हिरामण सूर्यवंशी यांचादेखील मृत्यू झाला आहे. दरम्यान, कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांना भेट देत कारवाईचे आश्वासन दिले.

