नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांमुळे 20 व 21 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद


Due to the municipal council and nagar panchayat elections, the weekly market will remain closed on December 20 and 21 जळगाव (19 डिसेंबर 2025) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नगर परिषद/नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आयोगाच्या आदेशान्वये न्यायालयीन अपील व अन्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या प्रभागांतील जागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुसार भुसावळ, अमळनेर, पाचोरा, सावदा, यावल व वरणगाव येथे 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून 21 डिसेंबर 2025 रोजी भुसावळ, भडगाव, चाळिसगाव, अमळनेर, पाचोरा, सावदा, यावल, वरणगाव, फैजपूर, रावेर, चोपडा, जामनेर, एरंडोल, पारोळा, धरणगाव, नाशिराबाद या 16 नगर परिषदांमध्ये तसेच मुक्ताईनगर व शेंदुर्णी या उसेप नगर पंचायतींमध्ये मतमोजणी होणार आहे.

मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडे बाजारामुळे मोठी गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अँड फेअर्स अ‍ॅक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) अन्वये प्राप्त अधिकार वापरून दि. 20 डिसेंबर 2025 (मतदान दिवस) व दि. 21 डिसेंबर 2025 (मतमोजणी दिवस) रोजी नगर पालिका हद्दीतील भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याबाबत निर्देश घुगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !