मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले : राज्यात 75 टक्के नगराध्यक्ष महायुतीचे ; राज्यात 25 वर्षात कुणालाच मिळाले नाही इतके मोठे यश !


The Chief Minister stated clearly : 75 percent of the mayors in the state belong to the grand alliance; this is a massive success, unlike anything anyone has achieved in the state in 25 years! मुंबई (21 डिसेंबर 2025) : राज्यातील पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, हे देखील पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गेल्या 20-25 वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही. जो आज भाजपा आणि महायुतीला मिळाल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, 48 टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे तर 75 टक्के नगराध्यक्ष महायुतीचे आहेत.

129 नगराध्यक्ष भाजपाचे
फडणवीस म्हणाले, आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, जवळपास 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. आपण बघितले तर, आम्हा तिघांचे मिळून जवळपास 75 टक्के नगराध्यक्ष आहेत. तसेच नगरसेवकांचा विचार केल्यास भारतीय जनता पक्षाने नवा विक्रमच नोंदवला आहे. 2017 साली आम्ही क्रमांक एकचा पक्ष होतो, त्यावेळी आमचे (भाजपा) 1602 नगरसेवक होते. आता त्याच्या दुपटीहूनही अधिक तीन हजार 325 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे एकूण नगरसेवकांच्या तुलनेत 48 टक्के एवढे एकट्या भाजपचे निवडून आले आहेत. अर्थात प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळाले आहे.

मित्र पक्षांचे केले अभिनंदन
विशेषतः आमचे सहकारी एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांचेही मी अभिनंदन करतो. त्यांच्याही पक्षाने अतिशच चांगला परफॉर्मन्स दिला आहे. एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स आम्ही रिपिट केला आहे. पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निडवणूक होत होती आणि या निवडणुकीत एक मोठं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं या बद्दल मी रविंद्र चव्हाण यांचेही अभिनंदन करतो. हा एक अभूतपूर्व विजय मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, 2017 पेक्षाही हा विजय मोठा आहे. गेल्या 20-25 वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही. जो आज भाजपा आणि महायुतीला मिळाला आहे, असेही पडणवीस म्हणाले.

सकारात्मक प्रचार केला
फडणवीस पुढे म्हणाले, सर्वात महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत मी अत्यंत सकारात्मक प्रचार केला. एकाही सभेत एकाही व्यक्तीच्या विरोधात अथवा पक्षाच्या विरोधात बोललो नाही, केवळ विकासावर मते मागीतली, आम्ही काय केले आणि काय करणार आहोत, हे सांगितले आणि त्याला सर्व मतदारांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. ही भारताच्या इतिहासातील पहिली निवडणूक असेल, ज्यात एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कुणावरही एक सूतभरही टीका न करता, त्यांचा पक्ष विजयी होतो. एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही तर पावती आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !