मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांचा के.एन.सी.टी.आय.संस्थेतर्फे सत्कार


भुसावळ (25 डिसेंबर 2025) : के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका झाल्याबद्दल संगीता अडकमोल यांचा सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळ आणि के.एन.सी.टी.आय. भुसावळ या दोन्ही संस्थांचे सेक्रेटरी पी.व्ही. पाटील, के.एन.सी.टी.आय .संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

पदाला न्याय देणार : अडकमोल
मुख्याध्यापिका अडकमोल मॅडम यांनी आपली भूमिका विषद करतांना विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचे सांगत पदाला न्याय देणारी असल्याची भूमिका मांडली.

संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी आपणास दिलेल्या जबाबदारीबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक सुनील पाठक यांनी अडकमोल यांना विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासंदर्भात विश्वास दर्शविला. संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांनी सुद्धा मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक व संगणक विभाग यांच्याकडून विद्यालयाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचा अनमोल सल्ला दिला.

प्रसंगी संस्थेतील भाऊसाहेब प्रमोद तळेले, सारिका भारंबे, वंदना चौधरी, संगणक विभागातील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. या छोटेखानी सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक सुनील पाठक यांनी केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !