एटीएम छेडछाडचा अलर्ट अन् 10 लाखांची रोकड वाचली : शिंदखेड्यात पोलिसांची सतर्कता


An ATM tampering alert and 10 lakhs in cash were saved: Police vigilance in Shindkheda शिंदखेडा (30 डिसेंबर 2025) : तोंडाला मास्क लावून चोरट्यांनी बोलेरो पिकअपद्वारा एटीएम पळवण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएममधील सेन्सरने अलर्ट दिल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात शिंदखेड्यात पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर चोरट्यांनी एटीएम जागेवर सोडून वाहनाने पळ केल्याने शिंदखेड्यात सुमारे दहा लाखांची चोरी टळली. या घटनेने मात्र पुन्हा एकदा एटीएम सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय घडले शिंदखेड्यात
शिंदखेडा शहराजवळील स्टेट बँकेचे एटीएम असून मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास बोलेरो वाहनातून आलेल्या चोरट्यांनी दोराच्या सहाय्याने एटीएम बाहेर ओढले मात्र त्याचवेळी एटीएमच्या सेन्सरने एसआय सिक्युरिटी कॅश मॅनेजमेंट सिस्टीमच्या गुरगावात अलर्ट दिल्यानंतर संबंधितांनी तातडीने पोलिस यंत्रणेशी संवाद साधला व त्याचवेळी शिंदखेडा पोलिस ठाण्याचे फौजदार ठाकरे व सहकारी गस्तीवर असताना त्यांनी धाव घेतली मात्र पोलीस येत असल्याची चाहूल लागताच चोरटे वाहनासह पसार झाले.

घटना सीसीटीव्हीत कैद : चोरट्यांचा शोध
मंगळवारी अडीच वाजता घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस येत असल्याचा सुगावा लागताच संशयीत जागेवरच एटीएम टाकून पसार झाले मात्र या एटीएममध्ये नऊ लाख 69 हजारांची रोकड असल्याने ती सुरक्षितरित्या वाचली आहे.

सर्वत्र नाकाबंदी
आरोपी पसार झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी नाकाबंदी लावण्यात आली असून संपूर्ण रेंजसह मध्यप्रदेश व गुजरात पोलिसांना देखील सूचित करण्यात आले. सीसीटीव्हीद्वारे अधिक तपास सुरू असून फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !