भुसावळच्या के.नारखेडे विद्यालयातील विनोद भंगाळे यांचे शासकीय स्पर्धेत नेत्रदीपक यश


भुसावळ (30 डिसेंबर 2025) : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा व विभाग स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपाल गटात के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.विनोद तुकाराम भंगाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगावचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांच्यातर्फे याबाबत नुकताच मूल्यांकन निकाल जाहीर करण्यात आला. त्यांच्या नवोपक्रमाचे शीर्षक ‘आठवणीतील कविता- जुन्या नव्या’ असे होते.

यशाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव
डॉ.भंगाळे यांच्या नवोपक्रमाची निवड आता राज्यस्तरासाठी करण्यात आली आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर नारखेडे, चेअरमन श्रीनिवास नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्था सदस्य भाग्येश नारखेडे, विकास पाचपांडे, ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, सुनील पाठक, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी भंगाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !