मंत्री गिरीश महाजनांचा कट्टर शिलेदार अरविंद देशमुख जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणांगणात


Minister Girish Mahajan’s staunch loyalist, Arvind Deshmukh, enters the battlefield of the Jalgaon Municipal Corporation elections जळगाव (30 डिसेंबर 2025)  : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून जळगाव जिल्ह्याला परिचीत असलेले अरविंद भगवान देशमुख हे जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत. भाजपाने त्यांना प्रभाग क्रमांक 15 अ मधून उमेदवारी दिली आहे. सामाजिक कार्यामुळे देशमुख यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून पक्ष श्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने त्यांनी आभार मानले आहेत.

अचूक रणनितीकार म्हणून ओळख
जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक तथा भाजपचे पदाधिकारी अरविंद देशमुख हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत शिवाय अचूक रणनितीकार म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या नेत्याने दिलेले प्रत्येक ‘टास्क’ पूर्ण करणे ही त्यांची खासियत मानली जाते. यात विशेष करून गत विधानसभा निवडणुकीत त्यांनी रावेर विधानसभा मतदारसंघात केलेले प्रयत्न हे सर्वांना ज्ञात आहेत तर जिल्हा दुध संघातही त्यांची कार्यकुशलता दिसून आली आहे. जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेत ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत व आरोग्यदूत म्हणून त्यांनी हजारो रुग्णांना मदत केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !