जळगाव हादरले : जुन्या वादातून तरुणाचा चाकूने वार करीत खून
हवालदार रमेश चौधरींनी दाखवली सतर्कता मात्र जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
Jalgaon shaken: A young man was murdered with a knife in a dispute stemming from an old rivalry जळगाव (31 डिसेंबर 2025) : जुन्या वादातून एक संशयीत तरुणावर चाकू हल्ला करीत असताना त्याचवेळी त्या कामानिमित्त आलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्यातील हवालदार रमेश चौधरी यांनी धाडस करीत आरोपीला ताब्यात घेतले तसेच जखमीला तातडीने उपचारार्थ हलवले मात्र उपचार सुरू असताना जखमी तरुणाचा मृत्यू ओढवला. ही घटना गोलाणी मार्केटमध्ये बुधवार, 31 रोजी दुपारी दोन वाजता घडली. साई गणेश बोराडे (वय 18, रा. शंकरराव नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
काय घडले जळगावात ?
देवकर महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेणारा साई परिवारासह शंकरराव नगरात वास्तव्याला होता. संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (25, रा. चौगुले प्लॉट,जळगाव) याच्याशी त्याचे जुने वाद होते शिवाय बुधवारी सकाळी देखील शुभम आणि साई यांचे एकमेकांशी किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर बुधवारी दुपारी गोलाणी मार्केट जवळ साई बोराडे हा आला असता संशयित शुभमने साईला पाहिले आणि त्याने चाकू काढून साई बोराडेच्या उजव्या बाजूला चाकूने वार केला तसेच डाव्या बाजूला देखील चाकू मारला.

हवालदाराची सतर्कता मात्र जखमीची मावळली प्राणज्योत
चाकू हल्ला होत असताना गोलाणी मार्केटमध्ये मोबाईलच्या कामानिमित्त आलेले एमआयडीसीचे हवालदार रमेश बाबुलाल चौधरी हे घटनास्थळी धावले. त्यांनी संशयित शुभम सोनवणे याला धरले आणि साई बोराडे याच्यावर आणखी वार होण्यापासून वाचवले. तत्काळ शुभम सोनवणे याला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात शस्त्रासह दिल. तसेच जखमीला नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय बाहेर दिल्यावर रुग्णालयात उपचारासाठी हलवले व प्रथमोपचार केल्यानंतर साई बोराडे याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले मात्र सायंकाळी उशिरा त्याची प्राणज्योत मालवली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
चाकू हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी व कर्मचार्यांनी घटनास्थळी नाव घेतली. रुग्णालयात जाऊन जखमीबाबत विचारपूस करून संशयित आरोपीविषयी माहिती जाणून घेतली. दरम्यान पोलीस हवालदार रमेश चौधरी यांनी दाखवलेल्या धाडसाचे नागरिकांसह पोलीस दलातून कौतुक होत आहे.
