कारवरील संदेशाने खळबळ : खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी बॉम्बशोधक पथक


Message on the car causes stir: Bomb disposal squad at MP Sanjay Raut’s residence. मुंबई (31 डिसेंबर 2025) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बुधवारी सकाळी भांडुप येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या एका गाडीवर ‘बॉम्ब से उडा दुंगा’ असे लिहिलेले आढळताच मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक राऊत यांच्या घरी धडकले. यावेळी संपूर्ण परिसराची तपासणी सुरू करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण ?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सक्रिय असलेले नेते खासदार संजय यांच्या बंगल्याबाहेर एक कार गेल्या अनेक दिवसांपासून एकाच जागी उभी आहे. गाडी वापरली जात नसल्याने त्यावर धुळीचा मोठा थर साचला आहे. बुधवारी सकाळी या गाडीच्या मागील काचेवर बोटाने लिहिलेला एक धक्कादायक संदेश कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आला.

काचेवरील मजकूर काय?
कारच्या काचवर हिंदीमध्ये आज हंगामा होगा! आज रात 12.00 रात बॉम्ब ब्लास्ट होगा असा मजकूर लिहिलेला आह तसेच कारच्या पाठीमागील काचेवर ‘सीएसटी में बॉम्ब ब्लास्ट होगा’ असा मजकूर लिहून स्माईलीचा इमोजी आहे. हा मजकूर पाहताच संजय राऊत यांच्या सहकार्‍यांनी तातडीने त्याचे फोटो काढून पोलिसांना पाठवले. त्यानंतर काही वेळातच पोलिसांचा मोठा फौजफाटा तपासासाठी दाखल झाला.

पोलिसांकडून कसून तपासणी
बॉम्ब शोधक पथकाने संजय राऊत यांच्या घराचा परिसर, बागेचा भाग आणि आसपासच्या गल्ल्यांची तपासणी केली आहे. ज्या कारवर हे स्टिकर चिटकवण्यात आले होते, ती कार कोणाची आहे? आणि हे स्टिकर नेमके कोणी लावले? याचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

यापूर्वी झाली होती ’रेकी’
संजय राऊत यांना धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या बंगल्याबाहेर ’रेकी’ केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. तब्बल दहा मोबाईल कॅमेर्‍यांमधून त्यांच्या घराचे फोटो काढण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !