जळगावात भाजपाने खाते उघडले : उज्वला बेंडाळे बिनविरोध


BJP opens its account in Jalgaon : Ujjwala Bendale elected unopposed जळगाव (1 जानेवारी 2026) : जळगाव महापालिकेसाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात निवडणूक होत असतानाच भाजपाने मात्र खाते उघडत एक जागा बिनविरोध केली आहे. प्रभाग क्रमांक 12 ब मधून उज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या असून त्यांच्या विरोधातील दोघा उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने उज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. उमेदवार बिनविरोध होताच भाजप पदाधिकार्‍यांकडून फटाके फोडून आणि एकमेकाला पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.

तिसर्‍यांदा जाणार महापालिका सभागृहात
उज्वला बेंडाळे या भाजपच्या माजी जळगाव शहरप्रमुख असून त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेच्या बाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. उज्वला बेंडाळे यांची ही हॅट्रिक असून त्या तिसर्‍यांदा महापालिकेच्या सभागृहात जाणार आहेत.

उज्वला बेंडाळे यांनी आपण आपल्या कार्यकर्त्यांसह शहरात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगत प्रभागातील समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे म्हणाल्या.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !