चौथीही मुलगीच झाल्याने पित्याने केली हत्या : जामनेर तालुक्यातील घटना


The father murdered his daughter because she was his fourth daughter : An incident from Jamner taluka जामनेर (1 जानेवारी 2026) : चौथी मुलगी झाल्याच्या रागातून पित्यानेच तीन दिवसांच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची संतापजनक घटना जामनेर तालुक्यातील मोराड गावात घडली. कृष्णा राठोड असे अटकेतील निर्दयी पित्याचे नाव असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले मोराड गावात ?
वास्तविक पाहता ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली होती. सुरुवातीला कुटुंबीयांनी अंघोळ करताना मुलगी पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.

चिमुकलीला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.. दीड महिन्यांनी वैद्यकीय अहवालात मुलीचा मृत्यू अपघाती नसून ठणक वस्तूच्या मारामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला.

तपासादरम्यान कृष्णा लालचंद राठोड या पित्यानेच चौथी मुलगी झाल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पहूर पोलिसांनी कृष्णा राठोड याला अटक करून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !