भुसावळातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये जनतेच्या पैशांची उधळपट्टी करीत निकृष्ट काम : नूतन नगरसेवक राज चौधरींचा आक्रमक पवित्रा


In ward number 20 of Bhusawal, public funds are being squandered on substandard work : New corporator Raju Chaudhary takes an aggressive stance भुसावळ (1 जानेवारी 2026) : भुसावळातील प्रभाग क्रमांक 20 चे नूतन अपक्ष नगरसेवक राज विजय चौधरी यांनी निकालानंतर मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांची भेट घेत समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत प्रभाग क्रमांक 20 मध्ये विद्युत दिव्यांची कामे तसेच ईतर काँक्रिटीकरणाची कामे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आल्याची तक्रार करीत हा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे म्हणत संबंधित कंत्राटदाराचे कुठल्याही प्रकारचे बोगस बिले काढू नयेत, अशी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकार्‍यांसह मंत्र्यांकडे तक्रारी
नगरसेवक राज चौधरी यांनी निकृष्ट कामांच्या तक्रारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी तसेच राज्याच्या नगरविकास विभागाच्या अधिकार्‍यांसह मंत्रालय कक्ष अधिकार्‍यांकडे केल्या आहेत. यावेळी मुख्याधिकारी तक्रारीची योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले.



सुविधा पुरवण्याबाबत चर्चा
यावेळी राज चौधरी यांनी प्रभाग क्रमांक 20 मध्ये बुद्धविहार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार उभारण्याकामी तातडीने व उपाय योजना व्हावी तसेच वॉर्डात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने त्या संदर्भात दखल घेण्याची मागणी केली शिवाय शहरातील अमृतचे काम अपूर्ण असल्याने हा प्रश्न सोडवण्यासह परिसरात कचरा कोंडी झाल्याने हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा केली.

सर्वात तरुण अपक्ष नगरसेवक
राज चौधरी हे भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध बिल्डर विजय चौधरी यांचे चिरंजीव आहेत. राजकारणाच्या माध्यमातून त्यांची पालिकेत इंट्री झाली असून पहिल्या दिवसांपासून ते कामाला लागले आहेत शिवाय सर्वात तरुण नगरसेवकदेखील ते आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !