भुसावळातील विषबाधा प्रकरण : 30 रेल्वे कर्मचार्‍यांना डिस्जार्ज तर शंभरावर कर्मचार्‍यांवर उपचार


Food poisoning incident in Bhusawal: 30 railway employees discharged, while over a hundred employees are receiving treatment भुसावळ (1 जानेवारी 2026) : शहरातील रेल्वेच्या क्षेत्रीय रेल प्रशिक्षण संस्थेतील (झोनल ट्रेनिंग सेंटर) प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांना मंगळवारी विषबाधा झाल्याने रेल्वे हॉस्पीटलमध्ये 130 तर खासगी हॉस्पीटलमध्ये 12 कर्मचार्‍यांवर उपचार करण्यात आले. रेल्वे हॉस्पीटलमधील 30 रुग्ण कर्मचार्‍यांना बरे वाटू लागल्याने त्यांना बुधवारी हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आता रेल्वे हॉस्पीटलमध्ये 100 कर्मचार्‍यांवर उपचार सुरू आहे. रेल्वे हॉस्पीटलमध्ये बुधवारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भेट देऊन रुग्ण कर्मचार्‍यांची विचारपूस केली.

भेंडी खाल्ल्याने विषबाधा
सोमवार, 29 रोजी रात्री दिलेल्या जेवणातून 150 प्रशिक्षणार्थी रेल्वे कर्मचार्‍यांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी पहाटे दोन वाजेपासून कर्मचार्‍यांना पोटदुखी, उलट्या, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे असा तीव्र त्रास सुरू झाला असल्याने त्यांना रेल्वे हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले. सोमवारी सायंकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत प्रशिक्षणार्थींना पोळी, डाळ, राजमा, भेंडीची भाजी, भात, पापड व सुजी हलवा असे जेवण देण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर अवघ्या काही तासांतच अन्नातून विषबाधेची लक्षणे दिसू लागली. मंगळवारी सकाळी सुमारे 150 कर्मचार्‍यांना रेल्वे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. अनेक कर्मचार्‍यांची प्रकृती खालावली होती. रेल्वे कर्मचार्‍यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी रेल्वे हॉस्पीटल येथे जात कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली, त्यांना धीर दिला.





मंत्री संजय सावकारे यांनी जाणली माहिती
रेल्वे हॉस्पीटल येथे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी बुधवारी रेल्वे हॉस्पीटलमध्ये जात उपचार सुरू असलेल्या रूग्णांची विचारपूस केली, त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे हॉस्पीटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !