थंडीसह धुक्याचा राजधानी, सचखंड, पवन एक्स्प्रेससह 11 गाड्यांना फटका
भुसावळ (1 जानेवारी 2026) : दिल्लीसह उत्तराखंडातील थंडी, धुक्याचा परिणाम प्रवासी रेल्वे गाड्यांवर होत आहे. यामुळे दिल्लीकडून येणार्या राजधानी एक्सप्रेससह 11 रेल्वे गाड्या बुधवारी नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावल्या. या गाड्यांना धुके, थंडीचा फटका बसला. यामुळे प्रवाशांना गाडीची वाट पहात ताटकळत बसावे लागले.
प्रवाशांचे नियोजन कोलमडले
थंडी, धुक्यामुळे रेल्वे गाड्या हळू धावत असल्याने नियोजित रेल्वे स्थानकांवर पोहोचण्यास या गाड्यांना विलंब होत आहे. यामुळे गाडीतील प्रवासी वैतागले आहे. थंडी आणि धुक्याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर होत आहे. गीतांजली एक्स्प्रेस तीन तास, सीतापूर एक्स्प्रेस 3.30, पठाणकोट एक्स्प्रेस तीन तास, कुशीनगर एक्स्प्रेस 4.30, पवन एक्स्प्रेस 5, सहरशा हमसफर एक्स्प्रेस 3.30, हरिद्वार एक्स्प्रेस 8, पंजाब मेल 2.30, सचखंड एक्स्प्रेस 6, राजधानी एक्स्प्रेस 3.30 व झेलम एक्स्प्रेस 3.30 तास नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावल्या. यामुळे प्रवाशांना तास न् तास थंडीत रेल्वे स्थानकावर बसून राहावे लागले. गेल्या पंधरा दिवसांपासून दिल्लीकडून भुसावळकडे येणार्या रेल्वे गाड्या लेटलतिफ झाल्याचा प्रवाशांना फटका बसत आहे.



