भुसावळातील नगरसेवक पिंटू कोठारींचा पाठपुरावा : प्रभाग 21 च्या रस्त्यांसाठी ‘नगरोत्थान’मधून तीन कोटींचा निधी मंजूर

नगरसेवक पिंटू कोठारीं म्हणाले ; आगामी काळात सर्वच प्रभागात काँक्रिटीकरण


Following up on the efforts of Bhusawal corporator Pintu Kothari, a fund of three crore rupees has been sanctioned from the ‘Nagarotthan’ scheme for the roads in Ward 21 भुसावळ (2 डिसेंबर 2026) : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी दोन कोटी 99 लाख तीन हजार 869 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन हा निधी मंजूर केल्याने प्रभाग 21 मधील रस्त्यांची स्थिती सुधारणार आहे. पालिकेच्या निवडणुकीनंतर शहरात सर्वप्रथम निधी मिळविण्याचा श्रीगणेशा नगरसेवक कोठारी यांनी केला.

या भागात होणार रस्त्याचे काम
शहरातील पूर्वीच्या प्रभाग 19 व नवीन प्रभाग 21 मधील इंडियन ओव्हरसीस बॅक ते कुंभारवाडा, अष्टभुजा मंदिर ते महाजन यांच्या घरापर्यंत, गोदावरी बँक ते डॉ.किरण झांबरे यांच्या घरापर्यंत, नवशक्ती आर्केड ते प्रविण गुंजाळ यांच्या घरापर्यंतचा भाग, श्रीराम नगर बुस्टर ते पाण्याच्या जलकुंभापर्यंतच्या मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले होते. या भागात निवडणुकीपूर्वी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी काँक्रिटीकरण कामाचे आश्वासन दिले होते. निवडणूक होऊन पंधरवडा उलटत नाही, तोच या रस्त्याच्या कामाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासकिय मंजुरी मिळाली आहे. आगामी काळात या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी निविदा प्रक्रिया होऊन पुढील कामे मार्गी लागतील, असे निर्मल कोठारी यांनी सांगितले.



सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण
डांबरीकरण रस्त्यांवर पाणी साचून खड्डे लवकर पडतात. यामुळे या भागातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करायचे आहे. यातील प्रमुख रस्त्यांचे आता दोन कोटी 99 लाख रुपयांच्या निधीतून काँक्रिटीकरण होईल. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व भागात रस्ते विकास करण्याचे नियोजन असल्याचे प्रभाग 21 चे नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी सांगितले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !