भुसावळात उद्या मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते मराठा समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन
In Bhusawal tomorrow, the foundation stone for the Maratha community’s community hall will be laid by Minister Sanjay Savkare भुसावळ (3 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील आयटीआय कॉलेजच्या मागील बियाणी स्कूलशेजारील नियोजित जागेवर मराठा समाज मंगल कार्यालयाचे (छत्रपती शिवाजी महाराज सभागृह) भूमिपूजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते रविवार, 4 रोजी सकाळी 10 वाजता होत आहे.
यांची असेल उपस्थिती
मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते भूमिपूजन होईल. यावेळी केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री रक्षा खडसे प्रमुख अतिथी असतील. भुसावळ मतदार संघातील समस्त सकल मराठा समाज-बांधवांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन मराठा समाज अध्यक्ष रवींद्र ढगे पाटील, नगरसेवक राजेंद्र आवटे, अॅड.हरीश पाटील, अॅड.तुषार पाटील, वांजोळा सरपंच मंगला गोपाळ पाटील, समाधान आप्पा पाटील आदींसह समाजबांधवांनी केले आहे.









