कडाक्याच्या थंडीत हजारो भाविकांची हिरा मारुतीकडे पदयात्रा

‘श्री राधाकृष्ण प्रभातफेरी’चा 13 वर्षापासून उत्साह : संगीतमय सुंदरकांड, महाप्रसाद


In the biting cold, thousands of devotees undertook a pilgrimage on foot to Hira Maruti भुसावळ (4 जानेवारी 2026) : शहरातील आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या ‘श्री राधाकृष्ण प्रभातफेरी’ परिवारातर्फे शनिवारी पहाटे हिरा मारुती मंदिराकडे पदयात्रा काढण्यात आली. कडाक्याची थंडी आणि पहाटे पसरलेल्या दाट धुक्याची तमा न बाळगत ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’च्या जयघोषात असंख्य भाविक या भक्तीमार्गावर अनवाणी पायी चालले. लक्ष्मी चौक येथील श्रीराम मंदिरापासून सकाळी महिला, पुरूष भाविकांच्या उपस्थितीत सुरू झालेली ही पदयात्रा भक्ती आणि उत्साहाचे प्रतीक ठरली.

श्रीराम मंदिरापासून पदयात्रेला प्रारंभ
शनिवारी पहाटे 5.54 मिनिटांनी लक्ष्मी चौकातील श्रीराम मंदिरापासून या पदयात्रेला प्रारंभ झाला. वातावरणात गारवा असला तरी भाविकांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. जाडगाव फाट्यावरील श्री हिरा मारुती मंदिराकडे जाणार्‍या या पदयात्रेत अबालवृद्धांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवाराने या पदयात्रेचे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केले होते.वाढत्या धुक्यामुळे सुरक्षेची काळजी घेत ही पदयात्रा यशस्वीपणे पार झाली. या उपक्रमामुळे भुसावळ शहर आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.




मार्गावर सेवाभावी उपक्रम
पदयात्रेच्या मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. अग्रसेन भवनजवळ निलेश शर्मा यांच्यातर्फे गरम दूध, नवनाथ मंदिर परिसरात देवेंद्र अग्रवाल यांच्यातर्फे चहा-बिस्किटे, तर वरणगाव रोडवरील राधाकृष्ण हॉटेलजवळ बद्रीनारायण अग्रवाल यांच्या परिवारातर्फे चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली. चालताना त्रास होणार्‍या भाविकांसाठी वाहनांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली.

संगीतमय सुंदरकांड आणि महाप्रसाद
पदयात्रा हिरा मारुती मंदिरात पोहोचल्यानंतर सकाळी नऊ वाजता पंडीत देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतमय सुंदरकांड पठण झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि सुमधुर संगीतात भाविक तल्लीन झाले होते. दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !