जळगावात आंतरराज्यीय टोळीचा धुमाकूळ : गॅस कटरने एटीएम फोडताना लाखोंच्या नोटा जळाल्या


An interstate gang wreaks havoc in Jalgaon: Millions of rupees worth of notes were burnt while they were breaking into an ATM with a gas cutter जळगाव (4 जानेवारी 2026) : आंतरराज्यीय चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र गॅस कटरमुळे एटीएममधील नोटा जळू लागल्याने चोरट्यांनी आल्या पावल्या पलायन करावे लागल्याची घटना जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरातील जकात नाक्याजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. आगीमुळे एटीएममधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

एटीएमची सुरक्षा वार्‍यावर
शहरातील एमआयडीसी हद्दीतील स्टेट बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी हा धाडसी चोरीचा प्रयत्न शनिवारी केला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातील रोकड लंपास करण्याचा डाव आखण्यात आला होता. त्या उद्देशाने चोरट्यांनी मशीनचा मोठा भाग कापला मात्र, कटरच्या उष्णतेमुळे आत भरून ठेवलेल्या लाखो रुपयांच्या नोटांना अचानक आग लागली. एटीएममध्ये धूर पसरताच घाबरून चोरट्यांनी पळ काढला.

सीसीटीव्हीत चार चोरटे कैद
एटीएम फोडण्याचा हा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चारचाकी वाहनातून चार संशयीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून आले असून चोरट्यांनी आधी एटीएमवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत ते निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी आंतरराज्य टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत असून फुटेजच्या माध्यमातून शोथ घेतला जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !