भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात 6 पासून स्नेहसंमेलन
The annual social gathering will be held at Nahata College in Bhusawal from the 6th भुसावळ (4 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाला मंगळवार, 6 पासून सुरुवात होत आहे. स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा पारंपारिक वेशभूषा व नृत्य स्वरांजली कार्यक्रम होईल.
6 रोजी पारंपरिक वेषभूषा स्पर्धा
मंगळवार, 6 रोजी विविध स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन केले आहे. वैविध्यपूर्ण भारतीय पोशाखांमधून विद्यार्थी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गुणांना वाव मिळावा म्हणून याच दिवशी विद्यार्थी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लाऊन त्यांची विक्री करणार आहे. बुधवार, 7 रोजी सकाळी 10 ते 3 पर्यंत नृत्य स्वरांजली कार्यक्रम होईल. यामध्ये एकल गायन, समूह गायन, समूह नृत्य, एकल नृत्य, मिमिक्री आदी कलांचा समावेश आहे.



यांची असेल उपस्थिती
कार्यक्रमास संस्थाध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमारजी नाहाटा, सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.डी.एन.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचेही आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे. यानंतर पारितोषिक वितरण होईल, असे महाविद्यालयातर्फे कळण्यात आले आहे.






