भुसावळात बर्निंग कारचा थरार  : सुदैवाने टळली प्राणहानी


A dramatic incident of a car catching fire in Bhusawal : Fortunately, no lives were lost भुसावळ (4 जानेवारी 2026)  भुसावळ बस स्थानकाजवळ ईओएन कंपनीच्या कारला अचानक आग लागल्याची घटना रविवार, 4 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने चालकाने आगीचा विळखा पसरण्यापूर्वीच रस्त्याच्या कडेला कार लागल्याने प्राणहानी टळली. अग्निशमन दलाने काहीच वेळात आगीवर नियंत्रण मिळवले मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अचानक लागली कारला आग
कार (एम.एच.19 सी.एफ.1978) ने चालक विकी साबणे हे घराकडे निघाल्यानंतर बसस्थानकाजवळ अचानक इंजिनमधून धूर येवू लागताच त्यांनी कार रस्त्याच्या कडेला पार्क केली व तितक्यात कारने पेट घेतला. पाहता-पाहता आग पसरू लागल्याने नागरिकांमध्ये थरकाप उडाला तर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी या घटनेत सुदैवाने कोणतीही मानवी हानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. पोलिसांनी यावेळी धाव घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !