यावल रस्त्याची दुरवस्था : वाहनधारक संतप्त


भुसावळ (5 जानेवारी 2026)  : भुसावळ शहर ते यावल या मुख्य रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावरील मोठ-मोठे खड्डे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. हे खड्डे सध्या अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत.

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असली तरी पालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदारांना या त्रासाला दररोज सामोरे जावे लागत आहे. विशेष करून रात्रीच्या वेळी मोठीच अडचण होते. पालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवून दिलासा द्यावा, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वाहनधारकांनी दिला आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !