मनसे विद्यार्थी सेनेच्या सोलापूर शहराध्यक्षांची हत्या : चार आरोपींना अटक
MNS student wing’s Solapur city president murdered: Four accused arrested सोलापूर (5 जानेवारी 2026) : मनसे विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून चार आरोपींना टोल नाक्यावर अटक करण्यात आली आहे. सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाल्यानंतर संशयीत पसार झाले होते. तळबीड पोलिसांनी तासवडे टोल नाक्यावर सापळा रचत चार आरोपींना अटक केली व आरोपींना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
उमेदवारी वादातून खून
काही दिवसांआधी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या वादातून मनसे विद्यार्थीसेनेचा शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदेंचा खून झाला होता. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली. या खून प्रकरणातील शंकर शिंदे, सुनील शिंदे, आलोक शिंदे आणि महेश भोसले हे चार संशयित पसार झाले होते.

दरम्यान, बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग दोनच्या उमेदवारासह 15 जणावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. भाजपच्या माजी नगरसेविका, प्रभाग 2 मधील उमेदवार शालन शिंदे, तीचा पती शंकर शिंदे यांच्यासह 15 जणावर हत्येचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे.
बाळासाहेब सरवदेंवर धारदार शस्त्राने वार
भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मयत बाळासाहेब याचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याच्या फिर्यादीवरून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

