भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये उपहागृहाचा शुभारंभ
The cafeteria was inaugurated at The World School in Bhusawal भुसावळ (6 जानेवारी 2026) : शहरातील कोलते फाऊंडेशन ‘द वर्ल्ड स्कूलमध्ये उपहारगृहाचा शुभारंभ सोमवार, 5 जानेवारी झाला. उपहारगृह हे हबल-बबल कॅफेशी संलग्न असून विद्यार्थ्यांसाठी पोषक पदार्थ येथे उपलब्ध होणार आहेत.
शुभारंभप्रसंगी शाळेचे अध्यक्ष निशिकांत कोलते, राजश्री कोलते यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. यावेळी सी.ए.रोहित कोलते, रचना कोलते, मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.









