यावल नगरपालिकेसमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उपोषण

स्वच्छता मुकादमाची हवी बदली


यावल (7 जानेवारी 2026) : यावल नगरपरिषद कार्यालयासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष कामराज घारू यांनी उपोषण सुरू केले आहे. नगरपरिषदेमध्ये स्वच्छता विभागात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी व्हावी तसेच स्वच्छता मुकादम यांची बदली करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे. तक्रार केल्यानंतर देखील कारवाई न झाल्याने त्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.

या मागण्यांसाठी उपोषण
नगरपरिषद कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी अजित पवार गटचे तालुका उपाध्यक्ष कामराज घारू यांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, यावल नगर परिषदेमध्ये आरोग्य अधिकारी संग्राम शेळके यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. व त्यांनी पुरुष सफाई कामगारांचे मुकादम मोबीन शेख यांना अतिरिक्त पदभार दिला आहे. यात स्वच्छता विभागात भोंगळ कारभार सरू असुन शहर आणि विस्तारित भागात व्यवस्थित स्वच्छता होत नसल्याने आपण वारंवार तक्रारी केल्या. व संबंधितांची चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र, मागणी मान्य न झाल्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले आहे. जोवर संबंधितांच्या बदली केली जात नाही व चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण कायम राहील असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या उपोषणाला राष्ट्रवादी शरदचंंद्र पवार गटाचे हितेश गजरे यांनी देखील पाठिंबा दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !