यावलमध्ये सलून दुकानदाराचा हरवलेला मोबाईल प्रामाणिकपणे केला परत
In Yaval, a lost mobile phone belonging to a salon owner was honestly returned यावल (7 जानेवारी 2026) : यावल शहरातील कटिंग सलून व्यावसायीकाचा हरवलेला मोबाईल एकास सापडला होता. तो मोबाईल त्यानेे प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केला.तेव्हा सदर इसमाच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काय घडले यावल शहरात?
हाफीज सब्दर पटेल (रा.विरार नगर, यावल) यांना यावल बस स्टँडच्या मागील परिसरात सापडला. त्यांनी माणुसकीच्या नात्याने व प्रामाणिकपणाचे उदाहरण ठेवत तो मोबाईल संबंधित मालक कटिंग सलुन चालक गोलू उर्फ सतीष सावखेडकर यांना त्वरित परत केला. यावेळी पटेल यांनी सांगितले की, ज्यांची वस्तू आपल्याला सापडते ती प्रत्येकाने परत केली पाहिजे. एखाद्या व्यक्तीची वस्तू हरवल्यावर होणारे दुःख आपण समजून घेतले पाहिजे. हरवलेली वस्तू परत मिळाल्यावर जो आनंद मिळतो, तो खरा समाधान देणारा असतो.


