शहापूरजवळ भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार


फत्तेपूर (7 जानेवारी 2026) : फत्तेपूरहून येणार्‍या सुसाट भरधाव डंपरने शहापूर गावाजवळ मोटारसायकलला धडक दिल्याने तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. गणेश भारत माळी (कसबा पिंपरी) असे मृताचे नाव आहे.

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही नागरिकांनी डंपरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण डंपर चालक सुसाट वेगात पसार झाला. विशेष म्हणजे या डंपरला नंबरप्लेट नव्हती. सुसाट वेगाने धावणार्‍या डंपर चालकांवर कारवाई करावी, असे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी महसूल व पोलिस प्रशासनाला दिले होते. पण कारवाईचा केवळ देखावा होत असल्याने तरुणाचा बळी गेल्याचे मत मृत गणेशच्या नातेवाइकांनी व्यक्त केले.

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणार कोण ?
जामेनर परिसरातून रोज शंभर डंपरमधून होतेय वाळू वाहतूक जामनेर तालुक्यात रोज शंभरावर डंपरमधून अवैध वाळू वाहतूक केली जाते. नेरीकडून जामनेरकडे व जामनेरमधून तालुक्यातील इतर गावाकडे सुसाट वेगाने धावणार्‍या डंपर चालकांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !