चार हजारांची लाच घेताना जामनेर तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात
A talathi from Jamner was caught in the net of the Jalgaon ACB while accepting a bribe of four thousand rupees जामनेर (7 जानेवारी 2026) : सातबारा उतार्यावर लाव लावण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच मागून स्वीकारताना जामनेर तलाठी वसीम राजू तडवी (27) यांना जळगाव एसीबीने पकडल्याने महसूल वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
लाच प्रकरणातील तक्रारदार जामनेरचे रहिवासी आहेत. त्यांनी 16 डिसेंबर 2025 रोजी जामनेर शिवारात दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले. या प्लॉटची खरेदी केल्यानंतर त्यावर स्वतःचे आणि पत्नीचे नाव अधिकार अभिलेखात तसेच 7/12 उतार्यावर लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय गाठले. ही फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी वसीम तडवी यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांची लाच मागितली मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 7 जानेवारी 2026 रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

सापळा रचून आरोपीला टटक
तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने बुधवार, 7 जानेवारी रोजीच पडताळणी केली. यावेळी पंच साक्षीदारांसमोर तलाठी तडवी याने 5 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती चार हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, भूषण पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.

