भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयामध्ये पारंपारिक वेशभूषा स्पर्धा
भारतीय नृत्यांने वेधले विद्यार्थ्यांचे लक्ष
भुसावळ (8 जानेवारी 2026) : शहरातील नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कलागुण सादरीकरण कार्यक्रम मंगळारी घेण्यात आले. फूड स्टॉल व पारंपारिक वेशभूषा कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी केले. फूड स्टॉल मध्ये विद्यार्थांनी विविध स्टॉल लावून रुचकर खाद्य पदार्थांची विक्री केली.
पारंपरिक वेषभूषा स्पर्धा
नाहाटा महाविद्यालयात पारंपारिक वेशभूषा स्पर्धामध्ये गुजराती नृत्य, महाराष्ट्रीयन लावणी, राजस्थानी, कोळी, तमीळ नृत्य, बंगाली नृत्य, आदिवासी नृत्य, पंजुली अवतार नृत्य, तळीम नृत्य आदी कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दर्शनही घडले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.डी.एन.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी, कला मंडळ प्रमुख प्रा.स्मिता बेंडाळे यासह प्राध्यापक वृंद उपस्थित होते.


विविध वेषभूषेसह विद्याथ्यार्ंंनी वेधले लक्ष
वेशभूषेत विद्यार्थ्यांनी भारतीयांच्या आसाम, तमीळ, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, या प्रातांतील वेशभूषा परिधान करून नृत्य सादर केले .शाहू महाराज व शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषेत शेतकर्यांच्या व्यथा, भारतीय संस्कृतीचे महत्त्व, महाविद्यालयीन जीवनावर काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. परीक्षक म्हणून डॉ विद्या पाटील, डॉ.रश्मी शर्मा, डॉ. राजेंद्र नाडेकर, डॉ.चंद्रकांत सरोदे हे होते. प्रा. डॉ. ममताबेन पाटील यांनी पारंपरिक वेशभूषा प्रमुख म्हणून तर प्रा. प्रणिता राणे या फूड स्टॉल प्रमुख म्हणून काम पहिले. सूत्रसंचालन प्रा डॉ दिनानाथ पाठक व प्रा सतीश अहिरे यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राद्यापक बंधु भगिनी आणि शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







