यावलला हिंदू परिवाराच्या घरून शोकाकुल वातावरणात निघाली खान बाबा यांची अंत्ययात्रा


Khan Baba’s funeral procession departed from the home of a Hindu family in Yaval amidst a sorrowful atmosphere यावल (8 जानेवारी 2026) : यावल शहरातील देवरे-सोनार या हिंदू कुटूंबाच्या घरापासून बुधवारी शोकाकुल वातावरणात खान बाबा या मुस्लिम वृध्दाचा जनाजा निघाला. खान बाबा हे मुस्लिम गृहस्थ तब्बल 80 वर्षांपासून देवरे-सोनार कुटुंबाकडे होते. यानंतर वार्धक्यामुळे ते थकले. तरीही सोनार कुटुंबीयांनी त्यांचा सांभाळ केला व वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खान बाबांना अखेरचा निरोप देतांना देवरे-सोनार कुटुंब गहिवरले होते.

हिंदू कुटुंबीयांनी मुस्लिम धर्म पध्दतीने दिला खांदा
यावल शहरात अशोक देवरे-सोनार, ज्योती देवरे, ऋषी देवरे या कुटुंबाकडे कय्युम खान नूर खान (100) हे अवघे वीस वर्षांचे असल्यापासून सराफी कारागीर म्हणून काम करत होते. 80 वर्षांचे होईपर्यंत खान बाबा हे सोनार कुटुंबाशी एकजीव होऊन राहिले. यानंतरही सोनार कुटुंबीय त्यांचा सांभाळ करत होते. वृद्धापकाळाने मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. कय्यूम खान हे शहरातील काजीपुरा भागातील मूळचे रहिवासी असून ते मुस्लिम समाजाचे आहेत. त्यांच्यावर मुस्लिम धर्मपद्धतीनुसार बुधवारी अंत्यविधी करण्यात आला व त्यांचा जनाजा अर्थात अंत्ययात्रा देवरे-सोनार कुटुंबाच्या घरापासुन कब्रस्तानपर्यंत काढण्यात आली.

कब्रस्तानमध्ये दफन विधी
प्रसंगी देवरे-सोनार कुटुंबाकडून मुस्लिम धर्म पध्दतीने खांदा देण्यात आला. कब्रस्तानमध्ये दफन विधी करीता देखील सदर कुटुंबीयांचा पुढाकार होता व त्यांना कब्रमध्ये मुठमाती दिली. खान बाबा यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पुणे व मुंबई येथे असलेले देवरे-सोनार कुटुंबातील मुले, मुली, जावई, नातवंडे यावलला दाखल झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !