भुसावळातील व्यापार्‍याची चुंचाळेजवळ रस्ता लूट : पाचही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी


A businessman from Bhusawal was robbed on the road near Chunchale: All five accused have been remanded to police custody for two days यावल (8 जानेवारी 2026) : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील चुंचाळे फाट्याजवळ दुचाकी चालकाला चाकूचा धाक दाखवून 24 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. या प्रकरणी अटकेतील पाच संशयीतांची पोलिस कोठडी संपल्याने बुधवारी त्यांना यावल येथील न्यायालयात हजर केले असता 9 जानेवारीपर्यंतची दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यातील 24 लाखांपैकी 19 लाख व दुचाकी पोलिसांनी हस्तगत गेली.

असे आहे लूट प्रकरण
28 डिसेंबरला दुपारी भुसावळ येथील किराणा मालाचे व्यापारी राजू पारेख यांच्याकडील वसुली कर्मचारी किरण प्रभाकर पाटील (50, रा.राम मंदिर वॉर्ड, भुसावळ) हे दुचाकीने (एम.एच.19 डी.डब्ल्यू.0547) ने चोपड्याकडून यावलमार्गे भुसावळला येत होते. त्यांच्याजवळ वसुलीची 24 लाखांची रक्कम होती. चुंचाळे फाट्याजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचा रस्ता अडवला. चाकूचा धाक दाखवून रोकड असलेली त्यांच्याजवळील पिशवी हिसकावून पलायन केले.

पाच आरोपींना कोठडी
या प्रकरणी अनस शाह अबुबकर शाह (20, रा.जळगाव), साहिल शहा सत्तार शहा (24, रा.नटराज टॉकीजजवळ, रामदेव बाबा नगर धुळे), जुबेर खान हमीद खान (33, रा.चोपडा), शोएब शेख इस्माईल शेख (25) व ईस्माईल खान शेर खान (25, दोन्ही रा.हुडको, जळगाव) अशा सर्व पाच संशयीतांना पोलिसांनी अटक केली. हे सर्व संशयीत 7 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत होते. या सर्व पाच संशयीतांना बुधवारी पुन्हा यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुनावणीअंती या सर्व पाच ही संशयीतांना 9 जानेवारीपर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, एपीआय अजयकुमार वाढवे,उपनिरिक्षक अनिल महाजन हवालदार सागर कोळी करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !