वस्त्रोद्योग क्षेत्रातील संधीवर गुहाटीत कार्यशाळा : मंत्री संजय सावकारे सचिव-आयुक्तांसह रवाना
Workshop on opportunities in the textile sector held in Guwahati : Minister Sanjay Savkare departs with the secretary and commissioner.भुसावळ (8 जानेवारी 2026) : गुहाटी (आसाम) येथे 8 व 9 जानेवारी रोजी होत असलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी मंत्री संजय सावकारे रवाना झाले आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्या पुढाकाराने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे बुधवारी गुहाटी येथे रवाना झाले. त्यांच्या सोबत सचिव, उपसचिव तसेच आयुक्त उपस्थित आहेत.
वस्त्रोद्योगाला मिळेल चालना
या दोन दिवसांच्या कार्यशाळेत वस्त्रोद्योग क्षेत्राचा सखोल व सुसंगत आढावा घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य पातळीवरील विद्यमान योजनांची अंमलबजावणी, उद्योगासमोरील अडचणी, रोजगार निर्मितीची क्षमता तसेच आगामी काळातील नवीन नियोजन व धोरणांची माहिती देण्यात येणार आहे. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांवर चर्चा होणार आहे.
या कार्यशाळेमुळे राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना मिळेल तसेच नवीन धोरणांमुळे उद्योग, कामगार व उद्योजकांना लाभ होईल, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.


