भुसावळात 11 रोजी श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळा
भुसावळ (9 जानेवारी 2026) : शहरातील पावन गजानन महाराज मंदिर व संजीवनी हनुमान मंदिर, त्रिमूर्ती केटर्सजवळ श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचे 11 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
असे असतील कार्यक्रम
सकाळी साडेपाच वाजता श्रींना अभिषेक, साडेसात वाजता नाव नोंदणी व ग्रंथ वाटप व त्यानंतर ग्रंथ वाचन, 9.30 वाजता अल्पोहार, 10 वाजता उर्वरित ग्रंथवाचन, एक वाजता नैवेद्य व आरती होईल. भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विजय राणे (9373236500) व दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधावा.









