भुसावळातील अपक्ष नगसेवक राज चौधरी अ‍ॅक्शन मोडवर : प्रभाग 20 मध्ये दिवाबत्तीसह लोंबकळलेल्या वीज वायरींचा प्रश्न निकाली


Independent corporator Raj Chaudhary of Bhusawal is in action mode: He has resolved the issue of streetlights and dangling electrical wires in Ward 20 भुसावळ (9 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेत सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या अपक्ष नगरसेवक राज विजय चौधरी यांनी निवडून आल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून जनहिताच्या कामाला प्राधान्य दिले आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये लोंबकळलेल्या वीज वायरींचा प्रश्न असल्याने त्यांनी तातडीने वीज कंपनीतील संबंधिताशी संवाद साधत वायरींचा प्रश्न निकाली लावला शिवाय या भागात वीजपुरवठ्याची समस्या सोडवण्यास लवकरच दोन डीपी बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली.

जागीच केली दुरुस्ती
प्रभाग क्रमांक 20 मधील अपक्ष नगरसेवक राज विजय चौधरी यांनी त्यांच्या संपूर्ण परिसरात पाहणी केली शिवाय ज्या ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था करायची असेल ते पाहून त्याबाबत वायरमनला सूचना केल्या व स्वतः उभे राहून दुरुस्ती करून घेतली तसेच याच भागात दोन नवी डीपी बसवावी असा प्रस्ताव देखील नगरपरिषदेकडे दिला आहे

नवीन डीपी लागल्यानंतर या भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठत्त सुरळीत होणार आहे. प्रभागातील जुन्या केबल व लोंबकळलेल्या तारेची व तसेच मेंटेनन्स मधील विजेचे पोल यांची दुरुस्ती करून नवीन केबल बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !