मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या जनसंपर्क अधिकारीपदी बी.बी.तपस्वी


B.B. Tapaswi has been appointed as the Public Relations Officer of the Central Railway Bhusawal Division. भुसावळ (9 जानेवारी 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले बी.बी.तपस्वी यांनी भुसावळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विभाग व नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी, पारदर्शक आणि तत्पर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अनुभवी अधिकार्‍याने उमटवला कार्याचा ठसा
बी.बी.तपस्वी हे भारतीय रेल्वेतील अनुभवी अधिकारी असून विविध जबाबदार्‍या पार पाडताना त्यांनी प्रशासकीय कार्यक्षमता, प्रवासी-केंद्रित दृष्टीकोन तसेच सार्वजनिक संवाद कौशल्यांचा ठसा उमटविला आहे. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून त्यांनी प्रवासी सुविधा, तिकीट व्यवस्थापन, महसूलवाढ, ग्राहक समाधान आणि सेवा गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागातील कार्यपद्धती, विकासात्मक उपक्रम, प्रवासी सुविधा, सुरक्षा, स्वच्छता तसेच विविध रेल्वे योजनांची माहिती प्रसारमाध्यमे व जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभाग प्रशासनाने त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी बी. बी. तपस्वी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात जनसंपर्क कार्य अधिक गतिमान व परिणामकारक होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !