जळगावात उपमुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ रद्द : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांभाळली कमान


Deputy Chief Minister’s ‘road show’ in Jalgaon cancelled : Guardian Minister Gulabrao Patil took charge जळगाव (9 जानेवारी 2026) : मुंबई महापालिका निवडणुकीतील व्यस्त कार्यक्रमांमुळे जळगावात गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित रोड शो ऐनवेळी रद्द झाला मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यानंतर यशस्वी कमान सांभाळत ‘रोड शो’ केला.

जळगाव झाले भगवेमय
जळगाव शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली. महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रोड शोसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या तर ठिकठिकाणी बॅनर्स, झेंडे आणि फलक लावून संपूर्ण मार्ग भगवेमय करण्यात आला. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला मासत्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याचे कळताच काहीसा हिरमोड झाला.

गुलाबराव पाटील यांनी स्वीकारले सूत्रे
राजकीय प्रचारात कोणताही खंड पडू नये यासाठी शिवसेना आणि महायुतीने तत्काळ हालचाली केल्या. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी महायुतीच्या अन्य नेत्यांबरोबरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेत नियोजित वेळेनुसार रोड शोला सुरुवात केली.

रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत
रोड शोच्या माध्यमातून जळगाव शहरातील विविध मार्गांवरून प्रचार रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या रोड शोमध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते आणि उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती नसली तरी प्रचारात कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असा ठाम संदेश यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला. संघटनेची ताकद आणि महायुतीतील एकजूट दाखवून देत रोड शो यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !