जळगाव महानगरपालिका निवडणूक : या ‘तीन’ दिवशी मद्य दुकाने राहणार बंद


Jalgaon Municipal Corporation Election: Liquor shops will remain closed on these ‘three’ days. जळगाव (9 जानेवारी 2026) : जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जळगाव महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान व 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणुकांच्या अनुषंगाने मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची प्रक्रिया शांततेत, निर्भय व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जळगाव महानगरपालिका हद्दीतील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहे.

जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती 14 जानेवारी 2026 (मतदानाच्या अगोदरचा दिवस) संपूर्ण दिवस, 15 जानेवारी 2026 (मतदानाच्या दिवशी) संपूर्ण दिवस तसेच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, तसेच सर्व संबंधितांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आदेशान्वये केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !