यावल शहरातील विस्तारीत भागात अस्वच्छता : स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आंदोलनाचा इशारा


Unsanitary conditions in the expanded areas of Yawal city : The NCP Ajit Pawar group warns of a protest for improved sanitation यावल (9 जानेवारी 2026) : यावल शहरातील विस्तारित वसाहतीतील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तत्काळ विस्तारीत भागात सक्षम स्वच्छता केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देण्यात आला.

तर शहरात आंदोलन
यावल नगरपालिकेच्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे विस्तारीत वसाहतीमधील विरार नगर, गंगा नगर व कॉलनी, आयसानगर भागातील गटारी तुंबल्या आहेत. या अस्वच्छता व सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. यावल नगरपालिकेच्या हद्दीतील विरार नगर, गंगा नगर तसेच इतर सर्व कॉलनी परिसरात गटारांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या गटारी या पूर्णपणे घाण पाण्याने तुंबलेली असतांना ही साफसफाई केली जात नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मनमानी कारभार उघडकीस
यावल नगरपालिकेच्या संबंधित ठेकेदारांचा मनमानी व निष्काळजी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. अनेक दिवसांपासून गटारे तुंबलेली असून घाण पाणी रस्त्यावर साचले आहे व त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे तसेच यामुळे नागरिकांना मलेरिया, डेंग्यू, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठेकेदारांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात कदीर खान (यावल) यांच्याकडे नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे. संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करून परिसरातील गटारी स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली तसेच भविष्यात अशा प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ही मागणी परिसरातील नागरिकांनी केली. नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेतली न गेल्यास राष्ट्रवादी यावल कार्याध्यक्ष कदीर खान यांनी पक्षाच्या माध्यमातुन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !