जळगावात व्यावसायीकाच्या डोळ्यात स्प्रे मारत आठ तोळ्यांची चैन लांबवली
In Jalgaon, a businessman was sprayed in the eyes, and an eight-tola gold chain was stolen from him जळगाव (9 जानेवारी 2026) : बांधकाम व्यावसायीकाच्या डोळ्यात दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी स्प्रे मारून गळ्यातील आठ तोळ्यांची सोन्याची चेन जबरीने लुटून लेली. ही घटना जळगावमधील मोहाडी रस्त्यावरील नयनतारा रेस्ट हाऊससमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले व्यावसायीकासोबत
शहरातील बांधकाम व्यावसायीक असलेले खुबचंद प्रेमचंद साहित्या (58, रा.मोहाडी रोड) हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांनी तेथे नाश्ता केल्यानंतर पुन्हा ईच्छादेवी चौफुली मार्गे पायी घराकडे जात होते. यावेळी मोहाडी रस्त्यावरील नयनतारा रेस्ट हाऊससमोर दोन दुचाकीस्वार त्यांच्या समोर आले.

दुचाकीवरून तोंडाला मफलर बांधलेला इसम खाली उतरला व त्याने खूबचंद साहित्या यांच्या डोळ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर त्याने साहित्या यांना मारहाण केली. ते जमिनीवर पडल्यानंतर त्यांच्या गळ्यातील आठ तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने ओढून घेत घटनास्थळावरून पळू गेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

