नंदुरबार शहरात भेसळयुक्त रसायनांद्वारे दुध विक्री : 20 लाखांच्या रसायनांसह दोघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
In Nandurbar city, milk was being sold using adulterated chemicals: Two individuals were caught by the crime branch with chemicals worth 20 lakhs नंदुरबार (9 जानेवारी 2026) : दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी जनावरांना घातक रसायने दिली जात असल्याची माहिती नंदुरबार गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेत पथकाने छापेमारी करीत दोन आरोपींना अटक केली शिवाय 20 लाख 20 हजार 32 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने नंदुरबार जिल्ह्यातील भेसळयुक्त दुधाची विक्री करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना नंदुरबारच्या गवळीवाडा परिसरात तुकाराम ऊर्फ खोक्या लाला गवळी हा त्याच्या घरात वेगवेगळया रसायनांना एकत्र करुन ते रसायन इंजेक्शनद्वारे दुभत्या जनावरांना देऊन त्याद्वारे जनावरांचे दुधाचे प्रमाण वाढवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी अन्न व औषध प्रशासनाची मदत घेत गुरुवार, 8 रोजी छापेमारी केली.

दोघांना अटक : 20 लाखांचा साठा जप्तज
तुकाराम ऊर्फ खोक्या लाला गवळी याच्या घराच्या व गोडावूनची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे रसायन बनविण्याचा कुठल्याही प्रकारचा परवाना नसतांना त्यांनी वेगवेगळया रसायनांचा वापर करुन म्हशींना पानविण्यासाठी येणारे रसायन तयार करण्यासाठी तब्बल 20 लाख 20 हजार 32 रुपयांचा साठा करून ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच आशिक लियाकत सरदार (24, रा.परगणा, पश्चिम बंगाल) हा रसायनांचा वापर करुन ते रसायन भरताना आढळल्याने दोघत्तंना पकडण्यात आले.
दोघांविरोधात गुन्हा
नंदुरबार शहर पोलिसात या प्रकरणी तुकाराम ऊर्फ खोक्या लाला गवळी (55, रा.नवा गवळीवाडा, नंदुरबार), आशिक लियाकत सरदार (24, रा.परगणा, पश्चिम बंगाल) विरोधात गु.र.नं. 09/2026 भा. न्या. संहिता कलम 123 210, 274, 276 सह प्राण्यांचे छळ प्रतिबंध अधि. कलम 11(1) (ग) 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, हवालदार महेंद्र नगराळे, राकेश मोरे, अजित गावीत, सचिन वसावे, दीपक वारुळे, नितीन गांगुर्डे, रामेश्वर चव्हाण, आनंदा मराठे, अभय राजपूत, महिला शिपाई रोहिणी धनगर आदींच्या पथकाने केली.

