जळगावात हॉटेलमधील वेटरचा खून : आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Hotel waiter murdered in Jalgaon : The accused has been apprehended by MIDC police जळगाव (11 जानेवारी 2026) : दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर हॉटेल वेटरचा संशयीताने खून केला मात्र प्रकरण अंगाशी येवू नये म्हणून मृतदेह अजिंठा चौफुलीनजीक टाकण्यात आला. सुरूवातीला बेवारस म्हणून असलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी खून झाल्याचे निष्पन्न करीत ओळख पटवून आरोपीलाही बेड्या ठोकल्या. भाऊसाहेब अभिमन पवार (रा. मराठे गल्ली, पातोंडा, ता.अमळनेर) असे खून झालेल्या इसमाचे तर हुसेन शेख आयुब शेख (रा. ट्रान्सपोर्ट नगर जळगाव) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.

काय घडले जळगावात ?
जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील अजिंठा चौफुलीनजीक बाबा बॅटरी समोर एक बेवारस इसम बेशुध्दावस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी मात्र त्याला तपासून मयत घोषित केले. मयत इसमाला मारहाण झाल्याचे तसेच त्याचा गळा आवळल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना कळाल्यानंतर त्यांनी पथकाला निददृश दिल्यानंतर सुरूवातीला मयताची ओळख पटवण्यात आली व नंतर आरोपीचाही माग काढण्यात आला. मयत हा अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी असून तो हॉटेलमध्ये वेटर होता तर संशयीतासोबत त्याचा दारूच्या नशेत असताना वाद झाल्याने त्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, राहुल कोळी आदींच्या पथकाने केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ करत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !