कोल्हापूर एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारला अपघात दोघे ठार ; पाटील यांची प्रकृती स्थिर


Kolhapur ACB Deputy Superintendent of Police Vaishnavi Patil’s car collides with another vehicle, killing two; Patil’s condition stable कोल्हापूर (11 जानेवारी 2026) : कोल्हापूर एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ अपघात झाला असून या अपघातात इनोव्हातील पाटील यांच्या सोबतच्या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर या अपघातात पोलिस उपअधीक्षक पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत.

पहाटेच्या सुमारास अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे हा अपघात झाला. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका लॉरीला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारचे मोठे नुकसान झाले आणि त्यामध्ये प्रवास करणार्‍या दोघांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला.

जखमींना त्वरित चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. वैष्णवी पाटील यांच्यावर तेथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी इनोव्हा आणि लॉरीच्या जोरदार धडकेत हा भीषण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरो वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !