दोन लाखांची लाच भोवली : नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांसह उपहारगृह चालक एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
A bribe of two lakhs proved costly: two sub-inspectors from Nashik’s Mumbai Naka police station and a restaurant owner were caught in the ACB’s net भुसावळ (11 जानेवारी 2026) : गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून ती खाजगी उपहारगृह चालकांच्या मदतीने स्वीकारताना नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांना नाशिक एसीबीने पकडल्याने पोलिस वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत. हा सापळा शनिवार, 10 रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला.
या लाचखोरांना अटक
अटकेतील संशयीतांमध्ये नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय एकनाथ गोडे (प्लॅट क्रमांक 14, शकुंतला हाईट, लक्ष्मीनगर, नाशिक), पोलिस उपनिरीक्षक अतुल भुजंगराव क्षिरसागर (रूम क्रमांक 44, शासकीय विश्रामगृहाची सिंहगड बिल्डींग, नाशिक), शासकीय विश्रामगृह सिंहगडमधील उपहार गृह चालक रमेश गंभीरराव अहिरे (61) व शासकीय विश्रामगृह सिंहगडमधील उपहार गृह चालक कल्पेश रमेश अहिरे (28) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
लाच प्रकरणातील मूळ तक्रारदार केतन भास्करराव पवार यांच्याविरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलिसात गुरनं.325/2025 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासह गुन्ह्यातील तपासाधिकारी दत्तात्रय गोडे यांच्यासाठी खाजगी पंटर कल्पेश रमेश अहिरे यांनी दोन लाखांची लाच मागितली व एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. 10 रोजी रात्री लाच स्वीकारताच खाजगी पंटरांना पकडण्यात आले तसेच लाचेला प्रोत्साहन दिल्याने अतुल क्षिरसागर व दत्तात्रय गाडे यांनाही अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे पोलिस उपअधीक्षक एकनाथ पाटील, हवालदार योगेश साळवे, हवालदार दिनेश खैरनार आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

