निवडणूक आयोगाने सांगितल्यास लाडकी बहिण योजनेचा हप्ता 16 जानेवारीला देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार


If the Election Commission instructs us to do so, we will release the installment of the ‘Ladki Bahin’ scheme on January 16: Deputy Chief Minister Ajit Pawar मुंबई (11 जानेवारी 2026) : निवडणूक आयोगाने सांगितल्यास आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 16 जानेवारीला देऊ, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 3000 रुपये बहिणींच्या खात्यात जमा करण्याच्या हालचाली सत्ताधार्‍यांनी सुरू केल्या मात्रकाँग्रेसने यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. 14 जानेवारीनंतरच हे पैसे देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सामंजस्याची भूमिका घेतली.

योजना ठरतेच प्रचाराचे मुख्य हत्यार
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी गेमचेंजर ठरलेली ही योजना आता महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे मुख्य हत्यार बनली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि मुंबईतील उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याबाबत समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर केल्या होत्या. याला काँग्रेसने ‘निवडणूक आचारसंहितेचा भंग’ असल्याचे मानत विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून आपण योजनेच्या विरोधात नसून केवळ निवडणुका संपेपर्यंत हप्ता न देण्याची विनंती केली आहे. या राजकीय पेचप्रसंगामुळे आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘रॉकी भाई’ टिप्पणीवर मिश्किल टिप्पणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा उल्लेख ’रॉकी भाई’ असा केला होता. यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल उत्तर दिले आहे. मी अद्याप केजीएफ सिनेमा पाहिलेला नाही. आधी मी तो चित्रपट पाहतो आणि मगच ठरवतो की रोहितने मला ‘रॉकी भाई’ म्हटले ते योग्य आहे की अयोग्य, असे दादांनी हसत हसत सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !