अजित पवार बोलतात माझे मात्र काम बोलते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


Ajit Pawar speaks, but my work speaks for itself : Chief Minister Devendra Fadnavis पुणे (12 जानेवारी 2026) :अजित दादा बोलतात, माझे मात्र काम बोलते, असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अभिनेत्री गिरीजा ओक हिने संवाद पुणेकरांची या कार्यक्रमात मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

देवा भाऊंचे काम बोलते
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. पण मला याठिकाणी सांगितलं पाहिजे की या निवडणुकीत आधी लक्षात आलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढता येणार नाही. दोन्ही भक्कम पार्ट्या आहेत, आम्ही एक नंबरचा पक्ष आहोत. आम्ही हे ठरवलं होतं, आपण वेगवेगळे लढतोय, मी असं सांगितलं होतं, जिथं आपण लढतोय तिथं मैत्रीपूर्ण लढती आहेत, असं समजूयात. मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, कदाचित निवडणुकीतील स्थिती पाहून दादांचा संयम कमी झालेला वाटतोय. ते 15 तारखेनंतर नाही बोलणार, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

परिवार एकत्र येत असल्याचा आनंद
कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरेंनी मला क्रेडिट दिलं याचा आनंद वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते दोघे एकत्र येत असतील तर त्याचा आनंद मला आहे, त्यांचे मला आशीर्वाद मिळेल. बहीण आणि भाऊ एकत्र आलेत का याचा अंदाज मला नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मेट्रो एकट्या राज्याची नाही
पुण्यातून जेवढी उडणारी विमानं आहेत तेवढ्या विमानात महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे अशी घोषणा करणार होतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मोफत मेट्रो प्रवासाच्या संकल्पनेची खिल्ली उडवली. लोकांचा विश्वास बसेल, अशा घोषणा केल्या पाहिजेत. मेट्रो एकट्या राज्याची नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी पुणेकरांना जवळून ओळखतो, ते कर भरणारे आहेत. पुणे करांना उत्तम अशा प्रकारची मेट्रोची, बसची सेवा हवीय. ती त्यांची अपेक्षा आहे. पुण्यातील टेकड्या हिरावल्या जाणार नाहीत, टेकड्यांवर जे काही अतिक्रमण झालंय त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. टेकड्या टिकल्या पाहिजेत, अशा मताचं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. विकास आराखडा तयार करताना पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात कुठल्या झोनमध्ये विकास होऊ शकतो त्याचं झोनिंग करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !