भुसावळचे डीवायएसपी अ‍ॅक्शन मोडवर : हद्दपार शहरात आल्यास कोठडीत टाका ; गुन्हेगारांवर आता मोक्कासह हद्दपारी


Bhusawal’s Deputy Superintendent of Police in action mode: Imprison those who return to the city after being banished; criminals now face MCOCA charges and banishment भुसावळ (12 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील वाढती गुन्हेगारी आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणणार्‍या समाजकंटकांविरुद्ध आता पोलीस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातून हद्दपार केलेले गुन्हेगार पुन्हा हद्दीत दिसल्यास त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करावेत तसेच सराईत टोळ्यांवर ‘मोक्का’ आणि हद्दपारीचे नवीन प्रस्ताव तातडीने तयार करा, असे सक्त आदेश डीवायएसपी केदार थोरबोले यांनी दिले. डीवायएसपी कार्यालयात विभागातील पोलीस अधिकार्‍यांच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.

प्रलंबित गुन्ह्यांवर चर्चा
भुसावळ उपविभागातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत थोरबोले बोलत होते. यावेळी शहरातील गुन्हेगारीचा आलेख आणि प्रलंबित तपासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जे गुन्हेगार सराईतपणे गुन्हे करत आहेत किंवा ज्यांच्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, अशांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या महत्त्वपूर्ण बैठकीला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले, नशिराबादच्या सहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे उपस्थित होत्या.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
हद्दपारांवर कारवाई- शहरातून कायदेशीररीत्या हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगार चोरट्या मार्गाने शहरात येत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर बीएनएस कलम 329 (आदेशाचे उल्लंघन) अन्वये गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मोक्काचे प्रस्ताव- संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले.

वाहतूक शिस्त- सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांना शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि विनापरवाना वाहन चालवणार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !