भुसावळातील सेवानिवृत्त आरपीएफ कर्मचार्‍याकडे साडेचार लाखांची चोरी : मध्यप्रदेशातील चोरटा जाळ्यात


A retired RPF employee in Bhusawal was robbed of four and a half lakh rupees: The thief from Madhya Pradesh has been apprehended. भुसावळ (12 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील रामायण नगर, कंटेनर रोड परिसरात चोरट्यांनी निवृत्त आरपीएफ कर्मचार्‍याच्या घरातून चार लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही चोरी 6 ते 9 जानेवारीदरम्यान घडली. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चार तासात मध्यप्रदेशातील चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. कुंदन गोरेलाल कचवा (रा, मध्य प्रदेश, ह.मु.पंधरा बंगला, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बंद घराला टार्गेट
शहरातील रामायण नगरात कृष्णकुमार मोहन पाठक हे निवृत्त आरपीएफ कर्मचारी वास्तव्याला आहेत. घराच्या पोर्चमध्ये ठेवलेल्या स्टूलवर चढून चोरट्यांनी गच्चीवर प्रवेश केल्यानंतर गच्चीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्याची चैन, मंगळसूत्र, कानातील बाळ्या, टॉप्स, पेंडल, नथ, चांदीचे पावल, जोडवे, अंगठी, बजाज कंपनीची इंडक्शन शेगडी व सायकल असा एकूण चार लाख 32 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चार तासात आरोपी जाळ्यात
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ई-साक्ष (डिजिटल पुरावे) नोंदवले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयीत सायकलीवरून जाताना दिसल्याने पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे कुंदन गोरेलाल कचवा (रा, मध्य प्रदेश, ह.मु.पंधरा बंगला, भुसावळ) यास अटक केली व त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीला भुसावळ न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !