धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : गावठी कट्ट्यासह संशयीत जाळ्यात


Major operation by Dhule Crime Branch: Suspect apprehended with a country-made pistol धुळे (12 जानेवारी 2026) :  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे उपद्रवींवर कारवाई सुरू असून 24 तासांपूर्वीच गावठी कट्ट्यासह संशयीताला पकडल्यानंतर पुन्हा गुन्हे शाखेने एका आरोपीला गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह पकडले आहे. आसीफ अहमद खलील अहमद अन्सारी (31, रा.बंदे नवाज कॉलनी, वडजाईरोड, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना धुळे शहरातील वडजाई रोडवरील कबीरगंज भागातील अपली हॉटेलजवळ संशयीत दहशत निर्माण होण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निेर्देश दिले. यावेळी पथकाने धाव घेत संशयीताला अटक केली. ही कारवाई रविवार, 11 रोजी करण्यात आली. संशयीताच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचा एक देशी गावठी कट्टा तसेच एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीविरोधात चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अन्सारीविरोधात यापूर्वी चाळीसगाव रोड व मोहाडीनगर, आझाद नगर पोलिसातही गुन्हा दाखल आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे, पोलीस उपनिरीक्षक शाम निकम, पोलीस अंमलदार सतीश जाधव, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, देवेंद्र ठाकूर, विवेक वाघमोडे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !